ICC World Test Championship 2025-27 Cycle: Full Schedule
क्रिकेटची पंढरी.. लॉर्ड्सवर दक्षिण आफ्रिकेने शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची चांदीची गदा त्यांनी जिंकली... २७ वर्षानंतर आफ्रिकेने आयसीसी स्पर्धा जिंकली आणि फायनलमध्ये त्यांनी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. WTC च्या तीन पर्वात तीन नवीन विजेते मिळाले आहेत.. भारत सुरुवातीच्या दोन्ही पर्वात अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते, परंतु न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाकडून त्यांना हार पत्करावी लागली. आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या पर्वाला १७ जूनपासून श्रीलंका विरुद्ध बांगलादेश मालिकेतून सुरुवात होणार आहे. ICC WTC 2025-2027 मध्ये २७ मालिका आणि लीग स्टेजमध्ये ७१ सामने खेळवले जातील, ज्यामध्ये पॉइंट टेबलमधील अव्वल दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.