WPL 2024 Eliminator: फायनलच्या तिकीटासाठी मुंबई-बेंगलोर संघात काट्याची टक्कर, कधी अन् केव्हा होणार सामना?

MI vs RCB, WPL 2024 Eliminator: वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे.
MI vs RCB | WPL 2024
MI vs RCB | WPL 2024X/wplt20

MI vs RCB, WPL 2024 Eliminator: वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात असून शुक्रवारपासून (15 मार्च) प्लेऑफला सुरुवात होणार आहे. प्लेऑफमधील पहिला सामना शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे.

डब्ल्युपीएलच्या दुसऱ्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवल्याने थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे, तर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने त्यांना अंतिम सामन्याचे तिकीट मिळवायचे असेल, तर एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे.

MI vs RCB | WPL 2024
WPL 2024 : 5 षटकार... 7 चौकार... शेफाली वर्माची तुफानी खेळी अन् दिल्लीचा संघ थेट दुसऱ्यांदा फायनलमध्ये!

दरम्यान, मुबंई इंडियन्सने प्लेऑफमध्ये पोहचण्याची ही दुसरी वेळ आहे. मुंबईने गेल्यावर्षी पहिल्या हंगामातही प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता, इतकेच नाही, तर त्यांनी विजेतेपदही जिंकले होते.

मुंबईने दुसऱ्या हंगामात साखळी फेरीत 8 पैकी 5 सामने जिकंले आहेत, तसेच 3 सामने पराभूत झाले आहेत.

बेंगलोरबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी डब्ल्युपीएलमध्ये प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्यावर्षी त्यांना पहिल्या तीन संघात स्थान मिळवण्यात अपयश आले होते. मात्र यंदा त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे.

बेंगलोरने यंदा साखळी फेरीत 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तसेच 4 सामने पराभूत झाले आहेत.

मुंबई आणि बेंगलोर संघात यंदा झालेल्या दोन सामन्यांपैकी एक सामना मुंबईने आणि एक सामना बेंगलोरने जिंकला आहे. दरम्यान आता शुक्रवारी या दोन संघात होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात जो संघ विजय मिळवेल, तो संघ 17 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळेल.

MI vs RCB | WPL 2024
WPL 2024 MIW : मुंबई इंडियन्सच्या इस्माईलने रचला इतिहास; टाकला महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर एलिमिनेटर सामन्याचा तपशील

कधी आणि कुठे होणार एलिमिनेटर सामना?

  • मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणारा एलिमिनेटर सामना 15 मार्च 2024 रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

किती वाजता सुरु होणार एलिमिनेटर सामना?

  • मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणारा एलिमिनेटर सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. त्याआधी ७ वाजता नाणेफेक होईल.

एलिमिनेटर सामना लाईव्ह कसा पाहता येईल?

  • ज्या चाहत्यांकडे तिकीट्स आहेत, ते स्टेडियममध्ये जाऊन प्रत्यक्ष सामना पाहू शकतात. तसेच टीव्हीवर स्पोर्ट्स 18 चॅनेलवरही हा सामना पाहाता येईल. त्याचबरोबर जिओ सिनेमा ऍप किंवा वेबसाईवरही हा सामना लाईव्ह पाहाता येणार आहे.

MI vs RCB | WPL 2024
WPL 2024 : दिल्लीत चालू मॅचमध्ये घडली मोठी घटना! बराच वेळ थांबवावा लागला सामना; नेमकं घडलं तरी काय?

असे आहेत संघ -

  • मुंबई इंडियन्स - हेली मॅथ्यूज, एस सजना, नतालिया सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, प्रियांका बाला (यष्टीरक्षक), शबनीम इस्माईल, सायका इशाक, क्लो ट्रायॉन, फातिमा जाफर, कीर्तना बालकृष्णन, इस्सी वोंग, यास्तिका भाटिया, जिंतिमणी कलिता, अमनदीप कौर.

  • रॉयल चॅलेंजरस् बेंगलोर - स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिवाईन, ऋचा घोष (यष्टीरक्षक), जॉर्जिया वेरेहम, दिशा कासट, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग, सिमरन बहादूर, इंद्राणी रॉय, शुभा सतीश, नादीन डी क्लर्क, सभिनेनी मेघना, केट क्रॉस, एकता बिश्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com