
भारतातील महिला प्रीमियर लीग या क्रिकेट टी-२० लीगला (WPL) आजपासून (१४ फेब्रुवारी) बडोदा येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेचा हा तिसरा मोसम आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूर व गुजरात जायंट्स यांच्या लढतीने या स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. या स्पर्धेमध्ये भारतातील स्थानिक खेळाडूंच्या कामगिरीकडे प्रकर्षाने लक्ष देण्यात येणार आहे.
पुरुषांच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) प्रमाणे महिलांच्या प्रीमियर लीगमधूनही (डब्ल्यूपीएल) देशातील स्थानिक खेळाडू नावारूपाला येत आहेत. श्रेयांका पाटील व साईका ईशाक या दोन्ही खेळाडूंनी महिला प्रीमियर लीगमध्ये दबावाखाली आपला खेळ उंचावला आणि भारतीय संघात स्थान मिळवले. यंदाच्या मोसमातही भारतातील स्थानिक खेळाडूंची कामगिरी लक्षवेधक ठरू शकणार आहे.