WPL 2025: स्मृती मानधनासमोर जेतेपद राखण्याचे आव्हान; तिसऱ्या हंगामात ३ भारतीय अन् २ परदेशी कर्णधार भिडणार

WPL 2025 Starts From Tommorow : महिला प्रिमिअर लीगच्या तिसऱ्या हंगामाला उद्यापासून सुरूवात होणार असून गुजरात जायंट्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघामध्ये उद्घाटन सामना रंगणार आहे.
WPL 2025
WPL 2025esakal
Updated on

WPL 2025 Starts From Tommorow : उद्यापासून (१४ फेब्रुवारी) महिला प्रिमिअर लिगच्या तिसऱ्या हंगामाला सुरूवात होणार आहे. डब्लूपीएलच्या पहिल्या हंगामात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावले. तर दुसऱ्या हंगामात स्मृती मानधनाच्या आरसीसबीने ट्रॉफी जिंकली. त्यामुळे आता तिसऱ्या हंगामात कर्णधार स्मृती मानधनासमोर जेतेपद राखण्याचे आव्हान असणार आहे. तर तिला हरमनप्रीत कौर, दिप्ती शर्मा या भारतीय आणि मेन लॅनिंग, बेथ मूनी या परदेशी कर्णधारांचा सामना करावा लागणार आहे.

वडोदरा, बंगळूरू, लखनौ व मुंबई या ४ ठिकाणी महिला प्रिमिअर लीगचे सामने खेळवण्यात येणार आहेत. १३ मार्च रोजी सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येईल. तर अंतिम सामना १५ मार्चला होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com