WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

Who Is Uma Kashvi?: १५ वर्षांच्या उमा काशवीने WPL ऑक्शनमध्ये इतिहास रचला. दिल्ली कॅपिटल्सने कर्नाटकच्या या युवा अष्टपैलू खेळाडूला १० लाख रुपयांत घेतलं.
Who Is Uma Kashvi?

Who Is Uma Kashvi?

esakal

Updated on: 

Who Is Uma Kashvi?: महिला प्रीमियर लीगच्या (WPL) २०२७ हंगामासाठी बुधवारी कोचीमध्ये मिनी ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमध्ये १५ वर्षांच्या उमा काशवीने इतिहास रचत,भारतभर चर्चा या खेळाडूची होत आहे. WPL ऑक्शनमध्ये विकली जाणारी ती सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली आहे. दिल्ली कॅपिटल्सने तिला तिच्या १० लाख रुपयांच्या बेस प्राइसमध्ये आपल्या संघात घेतलं.

याआधी WPL ऑक्शनमध्ये सर्वात कमी वयात विकली जाण्याचा विक्रम दिया यादवच्या नावावर होता. दिल्ली कॅपिटल्सने २०२६ च्या ऑक्शनमध्ये १६ वर्षांच्या दियाला संघात घेतलं होतं. आता उमा काशवीने तिचा विक्रम मोडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com