
RCB vs DC WPL 2025: मागच्या तीन सामन्यात विजय न मिळवलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघ गुणतालीकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध डब्ल्यूपीएलमधील १४ वा सामना खेळत आहे. कर्णधार मानधना स्वस्तात बाद झाली, पण एलिस पेरीच्या अर्धशतकाने व पेरी अन् राघवी बिस्टच्या मोठ्या भागीदारीच्या मदतीने बंगळुरूने डावात १४७ धावा उभारल्या. पण आज आरसीबी घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवणार का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.