
रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेत बंगालने शेवटच्या साखळी फेरीत पंजाबविरुद्ध १ फेब्रुवारी रोजी एक डाव आणि १३ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे बंगालने स्टार यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला विजयी निरोपही दिला.
वृद्धिमान साहाने यापूर्वीच जाहीर केले होते की यंदाचा हंगाम हा त्याचा कारकिर्दीतील शेवटचा हंगाम असेल. त्यामुळे बंगालचे या स्पर्धेतील आव्हान संपले असल्याने ४० वर्षीय साहाचा देखील हा अखेरचा सामना ठरला. त्याने या सामन्यानंतर निवृत्ती घेतली.