
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५ अंतिम सामना लॉर्ड्सवर बुधवारपासून (११ जून) सुरू झाला असून हा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळवला जात आहे. या सामन्याच पहिल्याच सत्रात दक्षिण आफ्रिकेने शानदार सुरुवात केली आहे. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाला ७० धावांचा आकडाही पार करता आलेला नाही.