WTC Points Table : रोहित शर्मा अन् ब्रिगेड टेबल टॉपर! एकाच सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला दिले दोन मोठे धक्के

WTC points table after Australia beat New Zealand : पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 172 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
WTC points table after Australia beat New Zealand Marathi News
WTC points table after Australia beat New Zealand Marathi Newssakal

WTC 2025 Points Table Latest Update : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 ​​च्या पॉईंट टेबलमध्ये भारत पुन्हा एकदा टेबल टॉपर झाला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने न्यूझीलंड संघांला दोन मोठे धक्के दिले. पहिला धक्का ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 172 धावांनी पराभव केला. आणि यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा भारतीय संघाला मोठा फायदा झाला तर न्यूझीलंडला संघाला दुसरा मोठा धक्का बसला. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

WTC points table after Australia beat New Zealand Marathi News
Ranji Trophy : तुषार, शार्दुलचा प्रभावी मारा ; तमिळनाडू १४६ धावांत गारद,पहिल्या दिवशी मुंबईचे वर्चस्व

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गमावल्यानंतर न्यूझीलंड संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत एक स्थान गमावले आहे. या पराभवानंतर किवी संघ दुसऱ्या स्थानावर घसरला. या पराभवामुळे न्यूझीलंडचे 60 टक्के गुण कमी झाले आहेत. भारतीय संघाचे 64.58 गुण आहेत. मात्र विजयानंतरही ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. संघाला 59.09 टक्के गुण आहेत.

WTC points table after Australia beat New Zealand Marathi News
पूर्वतयारी जोरदार हवी

भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-2025 मध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 5 जिंकले आहेत आणि 2 सामने गमावले आहेत. एक कसोटी सामना अनिर्णित राहिला.

टीम इंडिया सध्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. भारताने या मालिकेत आधीच 3-1 अशी अभेद्य आघाडी मिळवली आहे. डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने WTC 2023-25 ​​मध्ये 5 सामने खेळले आहेत, त्यापैकी संघाने 3 जिंकले आहेत आणि 2 सामने गमावले आहेत.

WTC points table after Australia beat New Zealand Marathi News
Pro Kabaddi : प्रो-कबड्डीने घडवली नवी पिढी - अनुपम गोस्वामी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो चुकीचा सिद्ध झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 383 धावा केल्या होत्या. कॅमेरून ग्रीनने संघाकडून 174 धावांची खेळी केली. मिचेल मार्शने 40 धावांचे योगदान दिले. जोस हेझलवूडने 22 धावा केल्या.

न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या 179 धावांत सर्वबाद झाला होता. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 369 धावांचं लक्ष्य दिलं, त्याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 196 धावांवर ऑलआऊट झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com