Chad Laycock takes five wickets in one over in South African T20 cricket
Chad Laycock takes five wickets in one over in T20 cricket: चॅड लेकॉकने दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पाच चेंडूत पाच विकेट्स घेणाऱ्या पहिल्या गोलंदाजाचा मान पटकावला. मंगळवारी पीटरमारित्झबर्ग येथे झालेल्या CSA Pro20 कपमध्ये टायटन्सविरुद्ध KZN इनलँडसाठी त्याने हा पराक्रम केला. लेकॉकने २६ धावांत ६ बळी घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्याने यापूर्वी सलग चार चेंडूंवर चार बळी घेण्याच्या आणखी एक पराक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पूर्ण सदस्य संघांमधील लसिथ मलिंगा, रशीद खान, कर्टिस कॅम्फर आणि जेसन होल्डर यांनी यापूर्वी ही कामगिरी केली आहे.