यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. २३ वर्षीय यशस्वीने काही महिन्यांपूर्वी गोवा संघाकडून खेळण्याची परवानगी मिळावी, यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेकडे ( MCA) ना हरकत प्रमाणपत्र ( NOC) मागितले होते. पण, त्यानंतर त्याने यू टर्न मारला आणि MCA ला त्याची विनंती मान्य करू नका, असे म्हटले. सोमवारी MCA ने ही मागणी मान्य केली आणि आता यशस्वी मुंबईकडूनच खेळणार असल्याचे स्पष्ट झाले.