Yashasvi Jaiswal | ENG vs IND 5th TestSakal
Cricket
Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी
Yashasvi Jaiswal Hundred in ENG vs IND 5th Test: इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत यशस्वी जैस्वालने शतकी खेळी केली आहे. त्याच्या शतकामुळे भारताने २०० धावांचा टप्पा पार करत इंग्लंडला टेन्शन दिलं आहे. त्याला आकाश दीपचीही चांगली साथ मिळाली.
Summary
भारत आणि इंग्लंड संघात ओव्हलवर पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सुरू आहे.
या सामन्याच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने शतक ठोकले आहे.
जैस्वालचे हे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसरे शतक आहे.

