Yashasvi Jaiswal Injury : मैदानावर परतणार की नाही...? यशस्वी जैस्वालच्या दुखापतीने टीम इंडियाची वाढली डोकेदुखी

Yashasvi Jaiswal IND vs ENG :
Yashasvi Jaiswal Injury
Yashasvi Jaiswal Injuryesakal

Yashasvi Jaiswal Injury : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने आपली आघाडी 322 धावांपर्यंत वाढवली. भारताने दिवस अखेर दुसऱ्या डावात 2 बाद 196 धावा केल्या होत्या. मात्र दिवस संपता संपता भारताला एक मोठा धक्का बसला. शतकवीर यशस्वी जैस्वाल दुखापतग्रस्त झाला. त्याच्या पाठीला दुखापत झाली. त्यामुळे तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला.

भारताच्या दुसऱ्या डावातील 45 व्या षटकात 104 धावांवर खेळणाऱ्या यशस्वी जैस्वालची पाठ अचानक दुखू लागली. त्यामुळे त्याला फलंदाजी करताना अडचण येत होती. दरम्यान, दोनवेळा फिजिओंनी मैदानावर येत त्याच्यावर उपचार देखील केले. मात्र यशस्वी जैस्वालच्या वेदना काही कमी झाल्या नाहीत. त्यानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये परतला.

Yashasvi Jaiswal Injury
IND vs ENG 3rd Test : यशस्वी-शुभमन जोडीचा धुमाकूळ; भारताची सामन्यावर मजबूत पकड

जरी यशस्वी जैस्वाल ड्रेसिंग रूममध्ये परतला असला तरी तो उद्या पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. तो रिटायर्ड हर्ट झाला आहे रिटायर्ड आऊट झालेला नाही. त्यामुळे जर तो उद्यापर्यंत फिट झाला तर तो नक्कीत फलंदाजीला येऊ शकतो. मात्र जर त्याची दुखापत गंभीर असेल तर त्याचा परिणाम फक्त तिसऱ्या कसोटीवर नाही तर संपूर्ण मालिकेवर पडणार आहे.

यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरूद्धच्या आतापर्यंतच्या तीन कसोटी सामन्यात एक अर्धशतक एक द्विशतक आणि एक शतक ठोकले आहे. त्याने अवघ्या 7 कसोटी सामन्यात तीन कसोटी शतकं ठोकली आहे. जर तो दुखापतग्रस्त झाला तर भारतासाठी ती मोठी डोकेदुखी ठरेल.

Yashasvi Jaiswal Injury
Ind vs Eng 3rd Test Day 3 : सिराजनंतर यशस्वीनं गाजवला तिसरा दिवस, भारताकडे भक्कम आघाडी

कारण केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आधीच दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. विराट कोहली देखील वैयक्तिक कारणामुळे ब्रेकवर आहे. अश्विनला देखील कौटुंबिक करणामुळे तिसऱ्या कसोटीतून अचानक माघार घ्यावी लागली. अशा परिस्थितीत यशस्वी जैस्वालला गंभीर दुखापत होणं भारतासाठी परवडणारं नाही. जरी तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत असला तरी क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं.

तसंच जरी भारताने तिसरा कसोटी सामना जिंकला तरी मालिका खिशात घालण्यासाठी भारतला चौथा कसोटी सामना देखील जिंकावा लागणार आहे. यामुळे या घडीला फॉर्ममध्ये असलेला यशस्वी जैस्वालला दुखापतीमुळे गमावणे भारताला परवडणारे नाहीये.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com