Shubman Gill says sorry to Yashasvi Jaiswal in Test : यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांच्या शतकांनी भारतीय संघाला हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या दिवशी फ्रंटफूटवर ठेवले. लोकेश राहुल व साई सुदर्शन हे मागोमाग माघारी परतल्यानंतर यशस्वी व शुभमन यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला.या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारी दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.