Will Yashasvi Jaiswal play the 2nd ODI against Australia

Will Yashasvi Jaiswal play the 2nd ODI against Australia

esakal

IND vs AUS 2nd ODI: रोहित निघून जाताच, गंभीर- आगरकरची Yashasvi Jaiswal सोबत चर्चा; उद्या खेळणार का? कोच म्हणाले...

Will Yashasvi Jaiswal play the 2nd ODI against Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या सराव सत्रात एक प्रसंग घडला. रोहित शर्मा सरावानंतर थेट टीम हॉटेलकडे रवाना झाला आणि त्यानंतर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर व प्रशिक्षक गौतम गंभीर यांची यशस्वी जैस्वाल सोबत दीर्घ चर्चा झाली.
Published on

Ajit Agarkar and Gautam Gambhir’s long chat with Yashasvi Jaiswal : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना गुरुवारी एडिलेड येथे होणार आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma ) व विराट कोहली यांच्यावर पुन्हा नजरा खिळलेल्या असणार आहेत. पहिल्या वन डेत दोन्ही सीनियर्स खेळाडूंना अपयश आले आणि २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळायचे असल्यास त्यांना चांगली कामगिरी करून दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी दोन्ही खेळाडू सराव सत्रात कसून घाम गाळत आहेत.

विराटने दुसऱ्या सराव सत्रात सहभाग घेतला नसला तरी रोहित दोन्ही दिवस जळवपास तास-दीडतास मेहनत घेताना दिसला. त्यात आजच्या सराव सत्रात रोहित आपला सराव आटपून एकटाच हॉटेलमध्ये निघून गेला. त्यानंतर अजित आगरकर व गौतम गंभीर यांनी बराच वेळ यशस्वी जैस्वालसोबत गप्पा मारल्या. त्यामुळे त्याला दुसऱ्या वन डेत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com