
Yashasvi Jaiswal Leaves Mumbai Because of Ajinkya Rahane : भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने अचानक मुंबई सोडून गोव्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुढील पर्वात तो गोवा संघाकडून खेळणार आहे. जैस्वालने मंगळवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून मुंबई सोडून गोव्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि असोसिएशनने त्याची विनंती मान्य केली.