
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये अभिषेक शर्मा व शुभमन गिल यांनी दमदार कामगिरी करून दाखवली आहे. हे दोघंही युवा फलंदाज भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) याच्या तालमीत तयार झाले आहेत. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन यानेही युवराजकडून प्रशिक्षण घ्यावे आणि तो आगामी ख्रिस गेल बनेल, असा दावा युवीचे वडील योगराज सिंग यांनी केला आहे.