Impact of Kohli and Rohit retirement on Indian Test cricket future: रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे आणि त्याआधी या दोघांचा निवृत्तीचा निर्णय संघात मोठी पोकळी निर्माण करून गेला आहे. शुभमन गिलकडे कसोटी संघाचे नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता आहे. भारतीय संघात स्थित्यंतर होत असताना युवा खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी संघात कुणीच नसल्याचे विधान केले गेले आहे.