२०१३ मध्ये कसोटी क्रिकेट संघात ६-७ क्रमांकावर पदार्पण करणारा रोहित शर्मा ( Rohit Sharma) बुधवारी यशस्वी सलामीवीर आणि यशस्वी कर्णधार म्हणून निवृत्त झाला. रोहितने ६७ कसोटी सामन्यांत ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या आहेत. त्यात १२ शतकं व १८ अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितच्या या अचानक निवृत्तीचा सर्वांना धक्का बसला, पण त्याच्या पुढील वाटचालीसाठी अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महान फलंदाज सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली ते जसप्रीत बुमराह, यसश्वी जैस्वाल यांनी सोशल मीडियावरून आपापलं मत मांडताना हिटमॅनला शुभेच्छा दिल्या.