

You Were Trying To Break My Leg- Rohit Sharma: भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी मागील दोन दिवस दुबईत कसून सराव करतोय. २०१३ नंतर भारताला पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचवायची आहे. २०१७ च्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला होता. त्याची परतफेड करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. १५ फेब्रुवारीला दुबईत उतरल्यानंतर खेळाडूंनी रविवार आणि सोमवारी दोन सराव सत्रांमध्ये भाग घेतला.