rohit sharma virat kohlieSakal
Cricket
क्रिकेटचं पाऊल पडतं पुढे! आशियाई, ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आणखी एका मोठ्या स्पर्धेत होणार समावेश
Cricket in 2030 Youth Olympic: ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश हा गेल्या काही दिवसात चर्चेचा विषय ठरला आहे. आता आणखी एका मोठ्या स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशाचे संकेत आयसीसीने दिले आहेत
Cricket in Youth Olympic 2030: ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश हा गेल्या काही दिवसात चर्चेचा विषय ठरला आहे. आता असे समजत आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) संकेत दिले आहेत की आगामी युथ ऑलिम्पिक २०३० स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीबरोबर (IOC) चर्चा करू शकतात.
गेल्यावर्षी भारतीय सरकारने असे संकेत दिले होते की २०३० युथ ऑलिम्पिक आणि २०३६ ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी बोली लावणार आहेत. याच गोष्टीवर अधारित आयसीसी हा विचार करत आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृ्त्तानुसार विवेक गोपालन नावाच्या वक्तीच्या ईमेलवर याबाबत आयसीसीचे जनरल मॅनेजर विलियम ग्लेनराईट यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिलं की 'ही चांगली कल्पना आहे, आम्ही यावर विचार करू शकतो.'