Abhishek Sharma: 'सिंगल भी ले लो महाराज', शिष्याच्या आक्रमक खेळ पाहून युवराजचा सल्ला; पाहा Video

Yuvraj Singh Shares Abhishek Sharma Video: युवराज सिंगने त्याचा शिष्य अभिषेक शर्माचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात त्याने त्याला खास मेसेजही दिला आहे.
Yuvraj Singh | Abhishek Sharma
Yuvraj Singh | Abhishek SharmaSakal
Updated on

Yuvraj Singh wishes Abhishek Sharma: भारताच्या दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये युवराज सिंग याचे नाव अवर्जून घेतले जाते. भारताला अनेक मोठे विजय मिळवून देण्यात त्याने मोलाचे योगदान दिले आहे. आता तो पंजाबमधील काही युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसतो, यात अभिषेक शर्माचाही समावेश आहे. अभिषेक हा युवीचा शिष्य.

नुकताच अभिषेकचा ४ सप्टेंबरला २४ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त युवराजने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओबरोबर एक मेसेजही त्याने अभिषेकसाठी लिहिला आहे. त्याने अभिषेकला एकेरी धावा घेण्याचाही सल्ला दिला आहे.

अभिषेक त्याच्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो. त्याने अनेकदा मोठे शॉट्स खेळत मोठ्या खेळी केल्या आहेत. त्याने आयपीएल २०२४ दरम्यानही त्याच्यातील हे आक्रमक फलंदाजीचे कौशल्य दाखवले होते. त्याने झिम्बाब्वे दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पणही केले होते.

Yuvraj Singh | Abhishek Sharma
Abhishek Sharma: यश एका दिवसाचं नाही...! युवराजने आपल्या शिष्यानं शतक ठोकल्यानंतर शेअर केला 'तो' Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com