Rohit Sharma : "रोहित, विराट कोहली यांना काय ते एकदाचं सांगून टाका..."; युवराज सिंग संतापला, गौतम गंभीर म्हणाला...

Yuvraj Singh Slams Uncertainty Over Senior Stars: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडेदरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली. रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर माजी अष्टपैलू युवराज सिंगने प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापनाला स्पष्ट भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.
Yuvraj Singh on Rohit Sharma retirement rumours

Yuvraj Singh on Rohit Sharma retirement rumours

esakal

Updated on

Yuvraj Singh on Rohit Sharma retirement rumours: रोहित शर्मा लॉर्ड्सवर शेवटची वन डे मॅच खेळणार... निवड समितीने त्याला २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी विचार करत नसल्याचे स्पष्ट सांगितलेय... अशा बऱ्याच चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. पण, रोहितने लॉर्ड्सवर खणखणीत शतक झळकावून या चर्चांना उडवून लावले.. असे असले तरी रोहित व विराट कोहली, या सिनीयर खेळाडूंच्या संघातील समावेशावर अनिश्चितता कायम आहेच. २०२७ चा वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून संघ व्यवस्थापन व निवड समितीच्या डोक्यात काही वेगळंच सुरू आहे. अशात भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला थेट सवाल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com