
Yuzvendra Chahal spotted with a MYSTERY GIRL in Mumbai: भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्नुसार या दोघांनी एकमेकांचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डिलीट केले आहेत आणि एकमेकांना अनफॉलोही केले आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये दुराव्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. या दोघांनी २०२० मध्ये लग्न केलं होतं आणि दोघंही एकमेकांसोबत खूपच आनंदी दिसत होते. या दुराव्याला धनश्री जबाबदार असल्याची चर्चा नेटिझन्स करत असताना एक बातमी समोर आली आहे.