

Mystery Girl With Yuzvendra Chahal : भारतीय संघाने काल दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला आणि तीन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ ठरला. हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सेलिब्रिटी आले होते. अनुष्का शर्मा, रितिका सजदेहसह अनेक जणं उपस्थित होते. पण, चर्चा रंगतेय ती फिरकीपटू युझवेंद्र चहलची.. नुकताच त्याचा धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाला आणि त्यानंतर तो प्रथमच सार्वजनिक ठिकाणी दिसला. चार वर्षांचा संसार मोडल्यानंतर युझवेंद्र चहल थोडासा दुःखी असेल असे चाहत्यांना वाटले होते, परंतु तो दुबईत मॅच पाहायला एका मुलीसोबत आलेला दिसला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.