RJ Mahvash buys cricket team in CLT10 league: भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याची मैत्रिण आरजे माहवश हिने क्रिकेट संघ खरेदी केला आहे. धनश्री वर्मासह घटस्फोट झाल्यानंतर चहल आणि माहवश यांची जवळीक वाढल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघं पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान दुबईत सामना पाहताना एकत्रित स्टेडियमवर दिसले होते. त्यानंतर पंजाब किंग्सला चिअर करण्यासाठी माहवश दिसली. दोन दिवसांपूर्वी चहलने अप्रत्यक्षरित्या प्रेमाची कबुली दिल्याच्या चर्चा रंगल्या. त्यात आता माहवशने क्रिकेट संघच खरेदी केला आहे.