ZIM vs AFG Test : ७५ वर्षांत न घडलेलं घडलं! झिम्बाब्वेच्या Craig Ervine ने रचला इतिहास; इतक्या वर्षात एकाही भारतीयाला हे नाही जमलं

Craig Ervine 206 runs against Afghanistan in Sharjah Test: वयाच्या ४१व्या वर्षीही फलंदाजीतील जिद्द आणि कौशल्य काय असतं, हे झिम्बाब्वेच्या क्रेग एर्विनने दाखवून दिलं आहे. अफगाणिस्तानविरुद्ध शारजाह येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एर्विनने ऐतिहासिक द्विशतक झळकावत क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधलं.
Craig Ervine becomes third-oldest player to score Test double century

Craig Ervine becomes third-oldest player to score Test double century

esakal

Updated on: 

Craig Ervine joins Eric Rowan and Jack Hobbs in elite list: झिम्बाब्वेच्या क्रेग एर्विनने अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात नाबाद द्विशतक झळकावून ऐतिहासिक कामगिरी केली. ४१ वर्ष व ८२ दिवसांचा क्रेग हा कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील तिसरा वयस्कर खेळाडू ठरला. यापूर्वी चाळीशीच्या पुढे असलेल्या ग्रॅहम गुच यांनी असा पराक्रम केला होता. १९९४ मध्ये त्यांनी द्विशतक झळकावले होते. एर्विनने २७९ चेंडूंचा सामना करताना २०६ धावा केल्या आणि संघाला दुसऱ्या डावात ५ बाद ५२३ धावांपर्यंत पोहोचवले. हा सामना ड्रॉ राहिला.

Loading content, please wait...