न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत झिम्बाब्वेवर ९ विकेट्स राखून विजय मिळवला
मॅट हेन्रीने ९ विकेट्स घेत प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार जिंकला
WTC मध्ये मात्र किवींना गुण मिळणार नाही, कारण...
Zimbabwe vs New Zealand 2025 Test match summary : न्यूझीलंडने बुलावायो येथे झालेल्या पहिल्या कसोटीत झिम्बाब्वेला ९ विकेट्सने पराभूत केले. अवघ्या ८ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडसमोर होते आणि त्याने एक विकेट गमावून ते पार केले. जलदगती गोलंदाज मॅट हेन्री ( Matt Henry ) याने या सामन्यात ९ विकेट्स घेत प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार जिंकला. दोन सामन्यांच्या मालिकेत किवींनी आता १-० अशी आघाडी घेतली आहे. पण, ही कसोटी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC) अंतर्गत येत नसल्याने किवींना कोणताच गुण मिळणार नाही.