ZIM VS NZ 2nd TEST Brendan Taylor Test comeback after ICC ban : झिम्बाब्वेचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार ब्रेंडन टेलरने गुरुवारी चार वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने बुलावायो येथील क्वीन स्पोर्ट्स क्लबमध्ये यजमान संघाकडून फलंदाजीची सुरुवात केली आणि किवींसमोर शड्डू ठोकून उभा राहिला.