IND vs ZIM : उद्या पहिली मॅच अन् झिम्बाब्वेने आज जाहीर केला ट्वेंटी-२० संघ! भारताला भिडण्यासाठी सज्ज; संघात तीन महत्त्वाचे बदल..

Zimbabwe T20 squad vs India 2026: भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी झिम्बाब्वे क्रिकेटने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. सिकंदर रझाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघात बांगलादेशविरुद्धच्या मालिकेच्या तुलनेत तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
IND vs ZIM Zimbabwe squad announcement

IND vs ZIM Zimbabwe squad announcement

esakal

Updated on

IND vs ZIM Zimbabwe squad announcement: भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला गुरुवारपासून सुरूवात होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ झिम्बाब्वेत दाखल झाला आहे आणि सरावालाही लागला. त्यात उद्या सामना अन् आज झिम्बाब्वेने त्यांचा १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. झिम्बाब्वेने नुकतीच बांगलादेशविरुद्धची वन डे मालिका २-१ अशी जिंकून इतिहास रचला आणि आता भारताला टक्कर देण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. या विजयी संघातील तीन खेळाडूंना भारताविरुद्ध विश्रांती देण्यात आली असून अनुभवी व तगड्या खेळाडूंना बोलावण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com