IND vs ZIM T20 Series : बोर्डाने केली मोठी घोषणा! टी-20 मालिकेच्या 1 दिवसआधी संघांला मिळाला नवीन कोच

India's tour of Zimbabwe 2024 : टी-20 वर्ल्ड कपचा थरार संपला आता टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर पोहोचली आहे.
IND vs ZIM T20 Series
IND vs ZIM T20 Seriessakal

India's tour of Zimbabwe 2024 : टी-20 वर्ल्ड कपचा थरार संपला आता टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर पोहोचली आहे. या मालिकेत दोन्ही संघांमध्ये पाच टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना सहा जुलै रोजी हरारे येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी झिम्बाब्वे संघाने कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल केला आहे. आता यजमान संघाला नवा गोलंदाजी प्रशिक्षक मिळाला आहे. जो या मालिकेदरम्यान झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे.

IND vs ZIM T20 Series
Team India Victory Parade: वानखेडेवर सेलिब्रेशनवेळी हार्दिकच्या हातात फॅनने फेकलेला शर्ट आला अन् मग बुमराह...

टीम इंडियासोबतच्या टी-20 मालिकेपूर्वी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज चार्ल लँगवेल्डला महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. आता चार्ल लँगवेल्ड यांना झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. चार्ल लँगवेल्ट यांनी यापूर्वी अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांसारख्या संघांचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. आता या मालिकेत चार्ल लँगवेल्डने झिम्बाब्वे संघाला भरपूर अनुभव आणला आहे.

IND vs ZIM T20 Series
Rohit Sharma Video: जगाचं प्रेम वेगळं अन् आईची माया वेगळी; विजयी पुत्राला पाहताच रोहितच्या आईने काय केलं पाहाच...

2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला आहे. आता माजी महान गौतम गंभीरकडे टीम इंडियाचे नवे प्रमुख म्हणून पाहिले जात आहे. गंभीरला अद्याप अधिकृत प्रशिक्षक बनवण्यात आलेले नाही, त्यामुळे व्हीव्हीएस लक्ष्मणला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. याशिवाय टीम इंडियाचे कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com