

Zimbabwe Vs Bangladesh
esakal
Zimbabwe Registers Historic Test Victory: झिम्बाब्वे क्रिकेटसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात झिम्बाब्वेने दणदणीत विजय मिळवत आपल्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये झिम्बाब्वेने अफगाणिस्तानला एका डावाने पराभूत केले होते. मात्र, बांगलादेशविरुद्धचा हा विजय त्याहूनही मोठा ठरला.
विशेष म्हणजे, झिम्बाब्वेने आपल्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच सलग दोन सामने एका डावाने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. नवीन कर्णधार रिचर्ड न्गारावा याच्या नेतृत्वाखाली संघाने पहिल्याच सामन्यात हा विक्रम केला.