
अजिंक्य रहाणेचा पहिल्या दोन वर्षांतील फॉर्म आता कमी झाला असली तरी कसोटी क्रिकेटमध्ये सध्या तरी तो पाचव्या क्रमांकासाठी उपयुक्त फलंदाज आहे, असे मत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई : अजिंक्य रहाणेचा पहिल्या दोन वर्षांतील फॉर्म आता कमी झाला असली तरी कसोटी क्रिकेटमध्ये सध्या तरी तो पाचव्या क्रमांकासाठी उपयुक्त फलंदाज आहे, असे मत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रहाणेला पर्याय म्हणून केएल राहुलकडे पाहिले जात आहे. राहुलने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असली तरी तो रहाणेचा पर्याय नाही कारण राहुलला पुन्हा स्थान मिळवायचे असेल तर त्याने देशांतर्गत स्पर्धांचा धावांचा रतिब घातला पाहिजे, असे मांजरेकरने म्हटले आहे.
दुष्काळात तेरावा महिना ! ऐन लॉकडाऊनमध्ये डिझेल दरवाढीने एसटीचे चाक आणखी खोलात...
गेल्या काही कसोटी सामन्यात रहाणेने धावा केल्या आहेत परंतु त्याच्यासारख्या फलंदाजाकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे, पूर्वी इतका तो सातत्यपूर्ण राहिले नाही. पण ज्या प्रकारे तो फॉर्मात येत आहे त्यावरून त्याचा आत्मविश्वास परत येत असल्याचे स्पष्ट होते, असे मांजरेकरचे म्हणणे आहे.
यंदाच्या आषाढी एकादशीला 'प्रति पंढरपूर'चे होणार दर्शन ऑनलाईन...
राहुल अखरची कसोटी मालिका खेळला तेव्हा तो फॉर्मात नव्हता. परंतु त्याने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकारात धावा करून निवड समितीसमोर स्वतःच्या नावाची चर्चा सुरू केली आहे, असे मत मांजरेकर यांनी मांडले. मधल्या फळीत स्थान मिळवायचे असले तर तुम्हाला देशांतर्गत सामन्यांमध्ये खोऱ्याने धावा कराव्या लागतात असे सांगताना मांजरेकर यांनी मयांक अगरवालचे उदाहरण दिले.
डबिंग करताना अभिनेत्री हीना खान घाबरली...काम सुरू केलेय; पण...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल अशी समालीची जोडी खेळवावी आणि पृथ्वी शॉला राखीव सलामीवीर म्हणून संघात ठेवावे, असेही मत मांजरेकर यांनी मांडले.