डबिंग करताना अभिनेत्री हीना खान घाबरली...काम सुरू केलेय; पण...

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 19 June 2020

बॉलीवूडमध्येही कोरोनामुळे प्रचंड उलथापालथ झाली असून जवळपास चित्रीकरण बंदच आहेत. आता पुढील आठवड्यात चित्रीकरण सुरू होत आहे. परंतु पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू झालेले आहे

मुंबई : जगभरात कोरोनाने एवढी दहशत पसरवली आहे की सर्वांचेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. जगभरात अनेक देशांमध्ये लॉकडाऊनमुळे सर्वांचे रोजचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या परिस्थितीत अनेकांना दोन वेळचे जेवणही भेटत नाही. कित्येकांचे आयुष्यच बदलून गेले. अनेकांनी घाबरून आपले जीवन संपविले आहे. 

दुष्काळात तेरावा महिना ! ऐन लॉकडाऊनमध्ये डिझेल दरवाढीने एसटीचे चाक आणखी खोलात...

बॉलीवूडमध्येही कोरोनामुळे प्रचंड उलथापालथ झाली असून जवळपास चित्रीकरण बंदच आहेत. आता पुढील आठवड्यात चित्रीकरण सुरू होत आहे. परंतु पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू झालेले आहे. छोट्या पडद्यावरील 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्री व गायिका हीना खानने नुकतेच डबिंग करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात ती माईकच्या समोर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरून व हावभावावरून ती घाबरलेली वाटत आहे.

बिग बॉस 11 मधील 'हा' स्पर्धक नैराश्यामध्ये; वाचा सविस्तर...

हीनाने फोटो शेअर करताना लिहिले आहे की, मास्क लावणे तेवढे सोप्पे नक्कीच नाही. मी डबिंगला सुरुवात केलीय खरी, पण मी घाबरलेली आहे. दररोज मी गरम पाणी पिते, हाताला सॅनिटायझर लावते आणि तोंडाला मास्कही लावले. पण अजूनही मनातून मला भीती वाटते. माझे लॉकडाऊन काळातील पहिले काम आहे. परंतु मी खरेच घाबरलेली आहे. स्टुडिओमध्ये सर्व काही निर्जंतुकीकरण केलेले आहे. पण मनात किंतु आहेच. मास्क लावलेला होता. पण शेवटी गाताना तो बाजूला करावाच लागला. बॉलीवूडमध्ये काम सुरू झालंय. आता येथेच स्टुडिओमध्ये किती जण आले आणि गेले? या शंकेने मन घाबरत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress hina khan told about work culture in lockdown