Mayank Agarwal Health : फ्लाइटमध्ये बसताच मयंकची तब्येत बिघडली, थेट आयसीयूमध्ये दाखल

Mayank Agarwal Health Latest Update : क्रिकेटपटू मयंक अग्रवालची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे.
Mayank Agarwal Ranji Trophy
Mayank Agarwal Ranji Trophysakal

Mayank Agarwal Health Latest Update : क्रिकेटपटू मयंक अग्रवालची तब्येत अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्याला त्रिपुराची राजधानी आगरतळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरतला जात असताना मयंक अचानक आजारी पडला. तोंडात आणि घशात जळजळ होत असल्याची तक्रार त्यांनी केली. यानंतर त्याला आगरतळा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या तो धोक्याबाहेर आहे.

क्रिकेटपटू मयंक अग्रवालला उलट्या आणि अस्वस्थता जाणवल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी रुग्णालयात आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये तो सौराष्ट्रविरुद्धचा पुढील सामना खेळणार नाहीये. तर उर्वरित संघ आज रात्री राजकोटला पोहोचणार आहे.

बंद बाटलीतील पाणी प्यायल्यानंतर लगेचच मयंकची तब्येत बिघडल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या तोंडात आणि घशात जळजळ होत होती. यानंतर त्याला तातडीने विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यांच्यासोबत संघ व्यवस्थापक रमेशही खाली उतरले. बाटलीतील पाण्यात काही मिसळले असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मयंक अग्रवाल रणजीमध्ये कर्नाटकचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखालील संघाने पहिल्या सामन्यात पंजाबचा सात गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर गुजरातविरुद्धच्या सामन्यात संघाला सहा धावांनी पराभव पत्करावा लागला. तर गोव्यासोबतचा सामना अनिर्णित राहिला. तर त्रिपुराविरोधात 29 धावांनी पराभव झाला. आता पुढचा सामना २ फेब्रुवारीपासून सुरतमध्ये रेल्वेविरुद्ध होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com