S Sreesanth booked in cheating case
S Sreesanth booked in cheating casesakal

S Sreesanth Cheating Case : मॅच फिक्सिंगचे आरोपामुळे बदनाम झालेला श्रीशांत पुन्हा गोत्यात! कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल

S Sreesanth booked in cheating case : भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीशांत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावेळी त्याच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी श्रीशांतविरुद्ध केरळमध्येही गुन्हा दाखल केला आहे. त्यात श्रीशांतसोबत त्याच्या दोन जवळच्या मित्रांचीही नावे आहेत.

तक्रारदार सरिश गोपालन यांनी आरोप केला आहे की, आरोपी राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी यांनी श्रीशांतच्या सहकार्याने स्पोर्ट्स अकादमी स्थापन करण्याचा दावा करून 25 एप्रिल 2019 पासून वेगवेगळ्या तारखांना 18.70 लाख रुपये घेतले. ही अकादमी कर्नाटकातील कोल्लूर येथे बांधली जाणार होती.

सरिशने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याला अकादमीचा भागीदार बनण्याची ऑफर देण्यात आली होती, ज्यासाठी त्याने पैसे गुंतवले. या प्रकरणी एस श्रीशांत आणि इतर दोघांविरुद्ध आयपीसी कलम 420 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी म्हणून श्रीशांतचा उल्लेख करण्यात आला आहे.

S Sreesanth booked in cheating case
Marlon Samuels banned : ICC ची मोठी कारवाई! 'या' वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूवर घातली ६ वर्षांची बंदी

श्रीशांत काही वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2008 मध्ये त्याचा हरभजन सिंगसोबत वाद झाला होता. त्यावेळी श्रीशांत आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळायचा आणि हरभजन मुंबई इंडियन्सकडून खेळायचा. एका सामन्यादरम्यान दोघांमधील वाद इतका वाढला की, लाईव्ह मॅचमध्ये हरभजनने श्रीसंतला कानाखाली मारली. परिणामी हरभजनवर संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती.

2013 च्या आयपीएल दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांत आणि त्याचे दोन सहकारी अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले होते. हे सर्वजण आयपीएलदरम्यान स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळले होते.

बोर्डाच्या तपासणीत सर्व आरोप खरे ठरले आणि श्रीशांतवर आजीवन बंदी घालण्यात आली. तथापि, 2015 मध्ये दिल्ली न्यायालयाने पुराव्याअभावी श्रीसंतला MCOCA कायद्यांतर्गत स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. त्यानंतर बीसीसीआयने श्रीशांतवरील बंदी सात वर्षांची केली. बंदी उठल्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळचे प्रतिनिधित्व केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com