क्रिकेट खेळाडूंचा समाजभानाचा "चौकार'! मदतीला पुढे सरसावले

लॉकडाउनमध्ये समाजाची भूक भागवण्यासाठी क्रिकेट खेळाडू पुढे सरसावले
Cricket
CricketCanva

मुंबई : "त्याने पुढे सरसावत कडकडीत चौकार मारला !' असे वर्णन आयपीएल स्पर्धा (IPL Cricket) चालू असताना केदार जाधव, ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी फलंदाजी करत असताना ऐकले होते. या वेळीही त्यांनी पुढे सरसावत कडक चौकार मारलाय; फक्त तो क्रिकेटच्या मैदानावर नाही तर चांगले सामाजिक काम (Social Work) करून ! (Cricketers stepped forward to satisfy the hunger of the society in the lockdown)

"सकाळ'च्या सामाजिक उपक्रमातून बोध घेत केदार जाधव, ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठीशी संपर्क साधला आणि तिघेही मदत करायला लगेच तयार झाले. या तिघांनी लगेच निधी जमा केला. "सकाळ'च्या माध्यमातून काही सामाजिक संस्थांची भूक पुढील काही महिन्यांसाठी शिधा देऊन मिटवण्याचा प्रयत्न केला.

Cricket
मराठा आरक्षण रद्दबाबत काय आहेत राजकीय नेते, संघटनांचे पदाधिकारी आणि तरुणांच्या भावना !

आत्ताच्या घडीला "आपलं घर'सारख्या संस्थेला मिळालेली ही मदत फार फार मोलाची आहे. सहृदयी व्यक्तींनी कृपया पुढे येऊन आपापल्या कुवतीनुसार मदत करणे नितांत गरजेचे आहे, तरंच चांगले काम करणाऱ्या सामाजिक संस्था कोव्हिड काळात तग धरू शकतील. अगदी छोटी वाटणारी मदतही मोठा दिलासा देऊ शकते. "थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे सगळ्यांनी मदत केली तर समस्या सुटू शकते, असे "आपलं घर"चे संचालक विजय फळणीकर म्हणाले.

आम्ही आवाहन करतो की, ही बातमी वाचून कृपया आपल्या शहरातील सामाजिक संस्थेला भेट देऊन त्यांना आपल्याला जी शक्‍य आहे ती मदत करा. तुम्ही दिलेले 50 रुपये किंवा 5 किलो तांदूळही मोठा दिलासा या संस्थांना देऊ शकतो, याचा सहानुभूतीने विचार करा. हीच वेळ आहे मदत करण्याची, सहानुभूती दाखविण्याची.

देणगी देऊन स्मृती जागवली

"साहित्य रंगभूमी' प्रतिष्ठानचे विश्वस्त अशोक कुलकर्णी यांचे वयाच्या 84व्या वर्षी अल्पशा आजारानंतर मंगळवारी निधन झाले. काका नावाने रंगकर्मींमध्ये लाडके असलेल्या अशोक कुलकर्णी यांची स्मृती जागवण्याकरता त्यांच्या कुटुंबीयांनी सगळे विधी रद्द करून बीड जिल्ह्यात ऊसतोडणी कामगारांची मुले, तमाशा कलावंतांची मुले आणि वेश्‍यांच्या मुलांचे संगोपन करणाऱ्या" शांतीवन' या सामाजिक संस्थेचा एका महिन्याचा भोजनाचा खर्च उचलला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com