रोनाल्डोने सामन्याच्या 64 व्या मिनिटाला रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू | Cristiano Ronaldo | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cristiano Ronaldo World Record

Cristiano Ronaldo : रोनाल्डोने सामन्याच्या 64 व्या मिनिटाला रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Cristiano Ronaldo : फिफा वर्ल्डकपमधील ग्रुप H च्या पोर्तुगाल विरूद्ध घाना सामन्यात पोर्तुगलचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला. ख्रिस्तियानो रोनाल्डोने 64 व्या मिनिटाला पेनाल्टीवर गोल डागत पाच वर्ल्डकपमध्ये गोल करण्याचा कारनामा करून दाखवला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला. दरम्यान, रोनाल्डोच्या गोलनंतर घानाने बरोबरीचा गोल डागला होता. मात्र पोर्तुगालने त्यानंतर दोन गोल डागत 3 - 1 असी आघाडी मिळवली. मात्र घानाचा बुकारीने 89 व्या मिनिटाला दुसरा गोल करत पोर्तुगलाचे टेन्शन वाढवलाे होते. मात्र घानाला 9 मिनिटांच्या इंज्यूरी टाईममध्ये सामना बरोबरीत नेणारा तिसरा गोल करता आला नाही. पोर्तुगालने सामना 3 - 2 असा जिंकला.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 : अनुभवी उरूग्वेला दक्षिण कोरियाचा बचाव भेदण्यात अपयश; सामना गोलशून्य बरोबरीत

पोर्तुगालने पहिल्या हाफमध्ये घानावर सातत्याने चढाया केल्या. कर्णधार रोनाल्डोला हेडरद्वारे गोल डागण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याचा हेडर गोलपोस्टच्या बाजूने गेला. दरम्यान, 31 व्या मिनिटाला फेलिक्सच्या पासवर रोनाल्डोने गोल मारत वर्ल्डकपमधील आपले खाते उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र पंचांनी लगचे शिट्टी वाजवून रोनाल्डोने फाऊल केल्याचे सांगत हा गोल रद्द केला. दरम्यान, घानाला पहिल्या हाफच्या उत्तरार्धात पोर्तुगालविरूद्ध एक कॉर्नर मिळाला होता. मात्र याचा त्यांना फायदा उचलचा आला नाही.

दुसऱ्या हाफमध्ये घाना आणि पोर्तुगालच्या खेळाडूंनी धसमुसळा खेळ केला. दरम्यान, पोर्तुगालने घानाच्या गोलपोस्टवर सतत आक्रमण करून दबाव वाढवला होता. यातच रोनाल्डोला पेनाल्टी मिळाली. ख्रिस्तियानो रोनाल्डोने 64 व्या मिनिटाला पेनाल्टीवर गोल डागत इतिहास रचला. त्याने पाच वर्ल्डकपमध्ये गोल करण्याचा कारनामा करून दाखवला.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 : रोनाल्डोचा विश्वविक्रम, पोर्तुगालचा विजय मात्र घानानेही दिली कडवी झुंज

पोर्तुगालकडून पेनाल्टीवर रोनाल्डोने पहिला गोल करत पाच वर्ल्डकपमध्ये गोल करण्याचा विश्वविक्रम केला. यानंतर फेलिक्स आणि लिओने पाठोपाठ गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली खरी. मात्र घानाच्या आंद्रे आयेवू आणि उस्मान बुकारीने देखील पोर्तुगालचा डिफेन्स भेदत त्यांना टेन्शन दिले. अखेर इंज्यूरी टाईममध्ये घानाला बरोबरी साधणारा तिसरा गोल करण्यात अपयश आले आणि पोर्तुगालचा यंदाच्या वर्ल्डकपमधील विजय निश्चित झाला. विशेष म्हणजे या सामन्यात पहिल्या हाफमध्ये एकही गोल झाला नाही.