अबतक 40 कोटी! रोनाल्डोनं इन्स्टावरील विक्रम केला आणखी भक्कम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cristiano Ronaldo

अबतक 40 कोटी! रोनाल्डोनं इन्स्टावरील विक्रम केला आणखी भक्कम

पोर्तुगाल आणि मँचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) मैदानाबाहेरही विक्रमावर-विक्रम आपल्या नावे करत आहे. नुकताच 37 वा बर्थडे साजरा केलेल्या रोनाल्डोनं इन्स्टाग्राम फॉलोअर्सचा मैलाचा पल्ला पार केला. त्याने 40 कोटी फॉलोअर्सचा (400 million followers) टप्पा पार केला. जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्स असणारा तो एकमेव व्यक्ती आहे.

रविवारी रोनाल्डोनं पत्नी जॉर्जिना रॉड्रिगेजसोबत बर्थडे साजरा केला होता. त्याने बर्थडे सेलिब्रेशनचे खास फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले होते. आयुष्यात कठोर मेहनतीच्या जोरावर वेगानं कठिण आव्हाने सहज पार करता येतात. पण यासाठी कुटुंबियाचे प्रेम, प्रामाणिकपणा आणि मैत्री यांचेही योगदान महत्त्वाचे ठरते, अशा आशयाच्या शब्दांत त्याने शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा: क्रिकेटरनं प्रेमाचा स्ट्रोक खेळला; पण तिला काडीचाही रस नव्हता

रोनाल्डोपाठोपाठ Kylie Jenner चा नंबर

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या व्यक्तींमध्ये रोनाल्डोपाठोपाठ Kylie Jenner चा नंबर लागतो. अमेरिकन मॉडेल आणि टिव्ही पर्सनॅलिटी काइली जेनरचे इन्स्टाग्रावर 30 कोटी 90 लाख फॉलोअर्स आहेत अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सीचे 30 कोटी 60 लाख फॉलोअर्स आहेत. रोनाल्डो हा 37 वर्षांचा असला तरी तो मैदानात उतरल्यानंतर आजही भल्याभल्यांना मागे टाकतो.

हेही वाचा: IPL Auction 2022 : अंडर-19 तील 4 हिरोंवर होईल पैशांची बरसात

वय फक्त आकडा

रोनाल्डोचा फिटनेस अजूनही कमालीचा आहे. तो अजूनही स्वत:ला तिशीत असल्याचे मानतो. एका मुलाखतीमध्ये त्याने वयावर भाष्य केले होते. वय वाढल्यानंतरही शरिर तुम्हाला साथ देते. तुमची मानसिकता महत्त्वाची असते, असे सांगत अजूनही मी तिशीत असल्याचे फिल करतो, असे त्याने म्हटले होते. रोनाल्डोला वयाच्या 42 व्या वर्षांपर्यंत खेळायचे आहे. 40, 41, 42 वर्षांपर्यंत खेळण्यासाठी प्रयत्नशील करेन, असेही तो म्हणाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर 184 सामन्यात त्याने 115 गोल डागले आहेत.

Web Title: Cristiano Ronaldo Becomes 1st Person To Garner 400 Million Followers On Instagram

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..