
Cristiano Ronaldo Family Trip Video: ख्रिसमस सण २५ डिसेंबर रोजी जगभरात धुमधडाक्यात साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधवांचा हा मोठा सण मानला जातो. फक्त ख्रिस्ती बांधवच नाही, तर जगभरातील इतर लोकही उत्साहाने ख्रिसमस साजरा करतात. काही लोकं हा सण घरी कुटुंबासोबत साजरा करतात, तर काही लोकं ख्रिसमस साजरा करण्यासोबत बाहेर फिरायला देखील जातात. ख्रिसमसच्या मुहुर्तावर स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो कुटुंबासह फिरायला गेला आहे.