Cristiano Ronaldo's Cryptic Social Media Post: जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या एका पोस्टने सध्या विश्वात खळबळ माजवली आहे. सौदी प्रो लीग २०२४-२५ च्या पर्वात रोनाल्डो प्रतिनिधित्व करत असलेल्या Al Nassr क्लबला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
रोनाल्डोकडून क्लबच्या विजयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न झालेले पाहायला मिळाले, परंतु त्याला सहकाऱ्यांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. सौदी प्रो लीगचे पर्व संपल्यानंतर रोनाल्डोने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आणि त्यावरून तो हा क्लब सोडत असल्याची चर्चा रंगली आहे.