FIFA World Cup 2022 : पेनाल्टी वाचवण्याची हॅट्ट्रिक! क्रोएशियाचा गोलकिपर लिव्हाकोव्हिकने रचला इतिहास

Croatia Defeat Japan In Penalty Shoot Out Livakovic Saved 3
Croatia Defeat Japan In Penalty Shoot Out Livakovic Saved 3esakal

Croatia Defeat Japan In Penalty Shoot Out Livakovic Saved 3 : गोलकिपर लिव्हाकोव्हिकने पेनाल्टी शूट आऊटमध्ये जबरदस्त सेव्ह करत गतवेळच्या उपविजेत्या क्रोएशियाला राऊंड ऑफ 16 मध्ये पोहचवले. त्याने जपानने मारलेल्या तीन पेनाल्टी सेव्ह करत दमदार कामगिरी केली. क्रोएशियाकडून व्लासिक, ब्रोझोव्हिक आणि पासालिक यांनी पेनाल्टी शूट आऊटवर गोल केले. तर जपानकडून फक्त असानोलाचा गोल करण्यात यश आले.

Croatia Defeat Japan In Penalty Shoot Out Livakovic Saved 3
Deepika Padukone : FIFA World Cup Final मध्ये दीपिका रचणार इतिहास, हा मान मिळवणारी ठरणार पहिली भारतीय अभिनेत्री

जपान आणि क्रोएशिया यांचा सामना एक्स्ट्रा टाईममध्ये देखील 1 - 1 असा बरोबरीत राहिला होता. जपानने यंदाच्या वर्ल्डकपमधील पहिल्या हाफमधला आपला पहिला गोल गतवेळच्या उपविजेत्यांविरूद्ध करत त्यांच्यावर दबाव आणला होता. मात्र दुसऱ्या हाफमध्ये क्रोएशियाने या गोलची परतफेड पहिल्या 10 मिनिटातच करत सामना बरोबरीत आणला. दोन्ही संघांना निर्धारित वेळेत बरोबरीची कोंडी फोडता आली नाही. त्यामुळे सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेला. तेथेही दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही.

संधी दवडणाऱ्या क्रोएशिला बसला फटका

फिफा वर्ल्डकप 2022 मधील आजच्या राऊंड ऑफ 16 सामन्यत जपान आणि गतवेळचे उपविजेते क्रोएशिया यांनी पहिल्या हाफमध्ये तसा तुल्यबळ खेळ केला. मात्र दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश येत होते. पहिला हाफ संपेण्यास अवघी काही मिनिटे शिल्लक असताना जपानने गोलचे खाते उघडले. जपानने 43 व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नवर दुसऱ्या प्रयत्नात उजव्या बाजूने क्रोएशियाच्या गोलपोस्टवर एक उत्तम चाल रचली. दोआनने क्रोएशियाच्या गोलपोस्टच्या दिशने एक क्रॉस पास दिला. हा पास योशिदाने हेडरद्वारे दैझेन माईदाच्या दिशेने सरकवला. यावर माईदाने 43 व्या मिनिटाला गोल साधत 1 - 0 अशी आघाडी घेतली.

विशेष म्हणजे जपानचा हा यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पहिल्या हाफमधील पहिलाच गोल ठरला. पहिल्या हाफमध्ये उपविजेत्या क्रोएशिला देखील गोल करण्याच्या उत्तम संधी मिळाल्या होत्या. दोनवेळा तर जपानच्या डीमध्ये कोणी नसताना क्रोएशियाला गोल करण्याची संधी होती. मात्र फिनिशिंगच्या अभावामुळे त्यांना गोल करता आले नाही. दुसरीकडे जपानने पहिल्या हाफमध्ये एकच ऑन टार्गेट शॉट मारण्याची संधी मिळाली अन् त्यांनी गोल केला.

Croatia Defeat Japan In Penalty Shoot Out Livakovic Saved 3
PAK vs ENG WTC Final : इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केल्याने फायदा होणार भारताचा; जाणून घ्या कसा

दुसऱ्या हाफमध्ये गतविजेत्यांनी साधली बरोबरी

दरम्यान, पहिल्या हाफमध्ये गोल खाल्यानंतर क्रोएशियाने दुसऱ्या हाफमध्ये पहिल्यापासूनच जपानच्या गोलपोस्टवर आक्रमक चढाया करण्यास सुरूवात केली. अखेर 55 व्या मिनिटाला लोव्हरेने एक अचूक क्रॉस दिला त्यावर इव्हान पॅरिसिकने हेडरद्वारे जपानशी बरोबरी साधणारा गोल केला. सामना बरोबरीत आल्यानंतर जपानने आपल्या आक्रमणाची धार वाढवली. त्यांनी क्रोएशियाच्या गोलपोस्टवर आक्रमक चढाया करत 1 - 1 ही बरोबरीची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. क्रोएशियाने हा सामना 90 मिनिटातच संपवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र दोन्ही संघांना ही कोंडी शेवटच्या सेकंदापर्यंत फोडता आली नाही. त्यामुळे सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेला. यंदाच्या वर्ल्डकपमधील हा पहिला एक्स्ट्रा टाईममधील सामना ठरला.

एक्स्ट्रा टाईममध्ये देखील दोन्ही संघांना मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही. सामना 1 - 1 असा बरोबरीतच राहिल्याने सामन्याचा निकाल पेनाल्टी शूटआऊटवर झाला. अखेर क्रोएशियाने 3 - 1 असा पेनाल्टी शूटआऊटवर सामना जिंकत क्वार्टर फायनल गाठली.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com