कडाक्याच्या थंडीत 'अवघड जागेच गोठणं'; ऑलिम्पियनवर आली ही वेळ!

Remi Lindholm
Remi LindholmSakal

चीन (China) च्या बीजिंगमध्ये विंटर ऑलिम्पिक (Winter Olympics) स्पर्धा पार पडली. जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू आता आपापल्या मायेदेशी पोहचले आहेत. फिनलंडच्या खेळाडूंन घरी परतल्यानंतर आपल्यासोबत घडलेला भयावह अनुभवाचे कथन केलं आहे. स्कीइंग क्रॉकंट्री क्रीडा प्रकारात त्याने भाग घेतला होता. स्पर्धेवेळी त्याच्यावर जी वेळ आली ती विचार करण्यापलीकडची होती.

फिनलंडचा (Finland) क्रॉसकंट्री स्कीयर रेमी लिंडहोम (Remi Lindholm) याने विंटर ऑलिम्पिकमध्ये 50 किमी मास स्टार्ट रेस क्रीडा प्रकारात भाग घेतला होता. शर्यत सुरु झाल्यानंतर प्रायवेट पार्ट (Frozen Penis) गोठण्याचा प्रकार घडला. खेळाडून स्वत: यासंदर्भातील माहिती दिली आहे. वातावरण खराब असल्यामुळे 50 किमीची ही शर्यत 30 किमी अंतर कापण्याची करण्यात आली होती.

Remi Lindholm
हिटमॅन म्हणतो, 'विराट' वर्कलोडचं नो टेन्शन!

या शर्यतीबद्दल प्रसिद्ध स्कीयर म्हणाला की, एवढी प्रचंड थंडी होती की, कोणत्याही वातावरणात राहून दाखवू शकतो म्हणणाऱ्यांसाठीही वातावरण बिकट होते. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा नियोजित वेळापेक्षा जवळपास एक तासांनी सुरु झाली. शर्यतीवेळी सर्व खेळाडूंनी आपले कान आणि तोंड पॅक केले होते. ज्यावेळी मी शर्यत संपली त्यावेळी प्रायवेट पार्ट गोठला होता यावरुन परिस्थिती काय होती, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता, असे तो प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना म्हणाला. हा भयावह अनुभव होता असे सांगत स्पर्धा आयुष्यातील सर्वात खराब होती, असे वर्णनही त्याने केले आहे.

Remi Lindholm
ब्रिटन म्हणते, Champions League Final रशियात नकोच!

त्याच्याबद्दल असा प्रकार घडण्याची ही पहिली वेळ नाही

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, शर्यत संपल्यानंतर लिंडहोमने लॉकरूममध्ये पोहचला. त्याने प्रायवेट पार्टवर (Private Part) हीट पॅकचा शेक दिला. शर्यत संपल्यानंतर शरीर गरम होईल तशी वेदना वाढत होत्या, असेही त्याने सांगितले. लिंडहोमवर अशी वेळ येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी फिनलंडमध्ये आयोजित एका स्पर्धेदरम्यानही त्याच्यासंदर्भात असाच प्रकार घडला होता. बीजिंग विंटर ऑलिम्पिकमध्ये 30 किमी अंतर शर्यत त्याने 1 तास 15 मिनटे आणि 55.6 सेकंदात पूर्ण करत 28 वे स्थान मिळवले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com