हिटमॅन म्हणतो, 'विराट' वर्कलोडचं नो टेन्शन!

मला विश्रांतीची गरज नाही मी सर्व सामने खेळणार : रोहित
Rohit Sharma Statement About Taking Break
Rohit Sharma Statement About Taking Break esakal

लखनौ: श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेच्या (India vs Sri Lanka) तोंडावर भारतीय संघाला दुखापतीमुळे ग्रासले. वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि विंडीज मालिकेतील मालिकावीर सूर्यकुमार यादव हे दोघेही दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यातच विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना विश्रांती (Break) देण्यात आली आहे. दरम्यान, आज भारताचा नवा कसोटी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आपल्या उपलब्ध असण्याबाबत वक्तव्य केले. त्याने बायो बबलमध्ये (Bio Bubble) राहून देखील आपल्याला सर्व सामने खेळण्यात काही अडचण नाही. जर मला जाणवेल की आता ब्रेक घ्यायला हवा त्यावेळीच मी ब्रेक घेईन असे सांगितले. (Rohit Sharma Statement About Taking Break)

Rohit Sharma Statement About Taking Break
IND Playing 11 : टीम इंडियातील 'पुष्पा'ची एन्ट्री फिक्स है भाऊ!

विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर नेतृत्वाची माळ रोहित शर्माच्या गळ्यात पडली. मात्र रोहित शर्माचा फिटनेस (Rohit Sharma Fitness) पाहता तो तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणे त्याला जमेल का असा एक प्रश्न उपस्थित झाला होता. तीनही प्रकारात कर्णधार असलेल्या खेळाडूला जास्त सामने खेळावे लागतात. सध्याच्या बायो बबलमध्ये ते अजूनच अवघड होऊन बसते.

मात्र नुकताच दुखापतीतून सावरलेल्या रोहित शर्माने आता आपल्याला कोणतीच अडचण नसल्याचे सांगितले. रोहित श्रीलंकेविरूद्धची टी 20 मालिका सुरू होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला, 'सध्याच्या घडीला मला कोणतीच अडचण नाही आणि मी सर्व सामने खेळण्यास उत्सुक आहे.'

Rohit Sharma Statement About Taking Break
आरे कॉल बॅक करशील का? रितिकानं घेतली रोहितची फिरकी

तो पुढे म्हणाला की, 'कामाचा ताण हा पुढच्या गोष्टींवर अवलंबून असतो. दिवसागणिक तुम्ही त्याची चाचपणी करत असता. जर ब्रेक गरजेचा वाटला तर तुम्ही ब्रेक घेता. तुमच्या जागी दुसरा कोणी तरी येतो. तुमची जागा घेणारा तुमची पोकळी भरून काढू शकतो का याचा विचार केला जातो. त्याच्याकडे ती क्षमता आहे का हेही पाहिले जाते. सध्याच्या घडीला सर्व काही चांगलं सुरू आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com