Cricket South Africa terms Kagiso Rabada ban regrettable and unfair : आयपीएल सुरु असताना एप्रिलच्या सुरुवातीला प्रमुख गोलंदाज कागिसो रबाडा अचानक मायदेशी परतला होता. त्यावेळी आपण वैयक्तिक कारणाने मायदेशी परतल्याचे सांगितलं होतं. मात्र, आता त्यामागचं कारण पुढे आलं आहे. रबाडाने स्वत: यासंदर्भात खुलासा केला आहे. अंमली पदार्थांचं सेवन केल्याने आपल्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे आपण मायदेशी परतलो, असं त्याने सांगितलं आहे.