आमच्यासाठी काही निर्णय दुर्दैवी ठरले, CSK च्या हेड कोचने व्यक्त केली खंत | CSK coach Stephen Fleming on Devon Conway's dismissal due to DRS glitch | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CSK coach Stephen Fleming on Devon Conway's dismissal due to DRS glitch
आमच्यासाठी काही निर्णय दुर्दैवी ठरले, CSK च्या हेड कोचने व्यक्त केली खंत

आमच्यासाठी काही निर्णय दुर्दैवी ठरले, CSK च्या हेड कोचने व्यक्त केली खंत

आयपीएल 15 व्या सीझनमधील मुंबई विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना काल वानखेडे मैदानावर खेळवण्यात आला. हा सामना चेन्नईला मुंबई इंडियन्स संघाने 5 विकेट्सनी पराभूत केले. मात्र, क्रिकेट जगतात पहिल्या विकेटवर चेन्नईने घेतलेल्या डीआरएसची सुरु आहे. यासंदर्भात सीएसकेचे हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी (Stephen Fleming) खंत व्यक्त केली आहे.

सामना झाल्यानंतर फ्लेमिंग यांनी माध्यामांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी काही सामन्यात चुकीचे निर्णय घेण्यात आले असल्याची खंत व्यक्त केली.

शॉर्ट सर्किटमुळे चेन्नईच्या डावातील पहिल्या 10 बॉलपर्यंत डीआरएस सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे संघाचे मोठे नुकसान झाले. कारण दरम्यान घेण्यात आलेले काही निर्णय हे चुकीचे ठरले आहेत.

हेही वाचा: वानखेडेची बत्ती गुल, चेन्नई DRS ला मुकली; अंबानींचे मीम्स व्हायरल

सामन्यातील पहिल्या ओव्हरमधील डॅनियल सॅम्सने टाकली. या ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर सॅम्सने डेव्हॉन कॉनवेला एलबीडब्लूय आऊट केलं. अंपायरने कॉनव्हेला बाद घोषित केलं. मात्र, त्याला हा निर्णय मान्य नव्हता. त्यामुळे कॉनव्हेला रिव्ह्यू घ्यायचा होता. मात्र तांत्रिक बिघाडामुळे कॉनव्हेला रिव्ह्यू घेता आला नाही. काही वेळानंतर हा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला. मात्र तोवर उशीर झाला होता.

झालेल्या या घटनेसंर्भात बोलताना फ्लेमिंग यांनी निराशा व्यक्त केली. ते म्हणाले, सामन्या दरम्यान जे काय घडलं ते चुकिचे ठरलं. त्यामुळे आम्ही निराश झालो. मात्र, तो खेळाचा एक भाग आहे. काही निर्णय आमच्याबाजून घेण्यात आलं नाहीत. अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा: मायकल वॉनचा Virat Kohli ला सल्ला; 'लग्नापूर्वीचा विराट हो'

आमच्यासाठी काही गोष्टी सकारात्मक राहिल्या. मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंहने गोलंदाजी चांगली केली. आम्ही अपेक्षितप्रमाणे खेळ दाखवू शकलो नाही. आम्ही आता प्ले ऑफ स्पर्धेतून बाहेर पडलो आहे. आता उर्वरित सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करु. अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: Csk Coach Stephen Fleming On Devon Conways Dismissal Due To Drs Glitch

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPLCSKIPL 2022 auction
go to top