
वानखेडेची बत्ती गुल, चेन्नई DRS ला मुकली; अंबानींचे मीम्स व्हायरल
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात वानखेडेची बत्ती गुल (Wankhede Stadium Power Issue) झाल्याने नाणेफेकीला विलंब झाला. त्यात विद्युत पुरवठ्याबाबत समस्या असल्याने सामन्यातील पहिली चार षटके दोन्ही संघांना DRS घेता आला नाही.
याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनने इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली. एमसीएचे अधिकारी म्हणाले, 'नाणेफेक होण्यापूर्वी शॉर्ट सर्किट झाले होते. त्यामुळे व्यवस्थेत थोडा बिघाड झाला. यामुळेच नाणेफेकीला विलंब झाला. फ्लडलाईटला पुरेसा वीजपुरवठा होत नव्हता. याचबरोबर ब्रॉडकास्ट प्रॉडक्शनवरही परिणाम झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी यंत्रणा सुरळीत चालावी यासाठी प्रयत्न केले.'
हेही वाचा: MI vs CSK : रोहितने वाढदिवसादिवशीच पोलार्डला वगळले
मिळालेल्या माहितीनुसार डिझेल जनरेटरमध्ये काही बिघाड झाला होता. इथूनच ब्रॉडकास्ट प्रॉडक्शनला वीज पुरवठा होतो. त्यानंतर एमसीएने ब्रॉडकास्टला बॅक अप पॉवर सप्लाय दिला. मात्र हा सप्लाय कार्यान्वित होण्यासाठी वेळ लागला. दरम्यान, सीएसकेने पहिल्याच षटकात डेवॉन कॉनवेला (Devon Conway) शुन्यावर पायचीत झाला. मात्र या क्लोज डिसिजनवर कॉनवेला DRS घेता आला नाही. त्यामुळे चेंडू लेगस्टम्पवर आदळणार होता की लेग स्टम्पच्या बाजूने जाणार होता हे निश्चित करता आले नाही. दुसरीकडे जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) दुसऱ्या षटकात रिव्ह्यू मागितला मात्र त्याला मैदानावरील अंपायरचा निर्णयच मान्य करावा लागला.
हेही वाचा: हार्दिक पांड्या स्वार्थी, GT ला टाकले अडचणीत; माजी क्रिकेटपटूचा आरोप
दरम्यान, या सर्व घडामोडीचे सोशल मीडियावर चांगलेच पडसाद उमटले. अनेक नेटकऱ्यांनी मुकेश अंबानींचे (Mukesh Ambani Memes) वानखेडेची वायर कट करतानाचे मीम्स व्हायरल करण्यास सुरुवात केली.
Web Title: Wankhede Stadium Power Issue Drs Mukesh Ambani Memes Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..