रविंद्र जडेजाला अनफॉलो करण्याबाबत खुद्द CSK च्या सीईओंनीच केला खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Csk s instagram handle unfollows Ravindra Jadeja
रविंद्र जडेजाला अनफॉलो करण्याबाबत खुद्द CSK च्या सीईओंनीच केला खुलासा

जडेजाला अनफॉलो करण्याबाबत खुद्द CSK च्या सीईओंनीच केला खुलासा

चेन्नई सुपर किंग्जने (CSK) त्यांच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडलवर रवींद्र जडेजाला(Ravindra Jadeja) अनफॉलो केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सीएके आणि जडेजा यांच्या वादाची चर्चा तुफान रंगली आहे. दोघांमध्ये मतभेदाच्या अफवा सुरु झाल्या आहेत. अशातच, सीएसकेच्या सीईओने यासंदर्भात खुलासा केला आहे.

बरगडीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2022 च्या उर्वरीत हंगामातून बाहेर गेलेल्या जाडेजाला आता संघाने इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने जाडेजा आणि सीएसकेमध्ये गंभीर वाद असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा: CSK आणि जडेजा यांच्यात वाद ? संघाने इन्स्टाग्रामवरून केल अनफॉलो

अशातच, सीईओ काशी विश्वनाथन यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना याबाबत भाष्य केले. 'संघ व्यवस्थापन आणि जाडेजामध्ये कोणताच वाद नसून सोशल मीडियावर काय सुरु आहे, याबाबत मला अधिक माहित नाही. पण भविष्यात जाडेजा नक्कीच सीएसके संघातच असेल''. असे मोठे विधान विश्वनाथ यांनी यावेळी केलं.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (RCB) क्षेत्ररक्षण करत होता. दरम्यान अष्टपैलू रवींद्र जडेजाला दुखापत झाली आणि त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशी घोषणा चेन्नई सुपर किंग्जने बुधवारी त्यांच्या ट्विटर हँडलवरून केली आहे.

जडेजाने इंस्टाग्रामवर फ्रेंचायझीला अनफॉलो केली आहे. जडेजा गेल्या 10 वर्षांपासून फ्रँचायझीचा महत्त्वाचा भाग आहे. आयपीएल साठी संघाचा सर्वात महागडा खेळाडू म्हणून त्याला संघात घेतले होते. मात्र त्याने फ्रँजायझीला अनफॉलो केल्यामुळे क्रिकेट जगतात चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: Csk S Instagram Handle Unfollows Ravindra Jadeja Amid Rumours Of Rift Ceo Kasi Viswanathan Reacts

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top