CSK आणि जडेजा यांच्यात वाद ? संघाने इन्स्टाग्रामवरून केल अनफॉलो

आयपीएलमध्ये रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वाद झाला आहे.
csk and ravindra jadeja team unfollowed jadeja instagram
csk and ravindra jadeja team unfollowed jadeja instagramSAKAL

आयपीएलमध्ये रवींद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात वाद झाल्याच्या बातमीनंतर रवींद्र जडेजाने IPL 2022 मधून अधिकृतपणे बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. चेन्नई सुपर किंग्जने जडेजाच्या बरगडीला दुखापत झाल्यामुळे बाहेर गेला आहे असे कारण सांगितले आहे. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडलवर रवींद्र जडेजाला अनफॉलो केले आहे. दोघांमध्ये मतभेदाच्या अफवा आता सुरु झाल्या आहे.(CSK And Ravindra Jadeja Team Unfollowed Jadeja Instagram)

csk and ravindra jadeja team unfollowed jadeja instagram
'लिंबू मिरची कुठे आहे' राजस्थान रॉयल्सच्या त्या ट्विटची चर्चा

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध (RCB) क्षेत्ररक्षण करत होता. दरम्यान अष्टपैलू रवींद्र जडेजाला दुखापत झाली आणि त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशी घोषणा चेन्नई सुपर किंग्जने बुधवारी त्यांच्या ट्विटर हँडलवरून केली आहेत. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत माहितीनुसार रवींद्र जडेजाला बरगडीला दुखापत झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात रविवारी तो चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळला नव्हता. तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. वैद्यकीय सल्ल्याने त्याला आयपीएलच्या उर्वरित सामन्यासाठी वगळण्यात आले आहे.

csk and ravindra jadeja team unfollowed jadeja instagram
आत्मसन्मानाविरुद्ध प्रतिष्ठेची लढाई; मुंबईचा गतविजेत्या चेन्नईशी लढत

दरम्यान जडेजाने इंस्टाग्रामवर फ्रेंचायझीला अनफॉलो केली आहे. जडेजा गेल्या 10 वर्षांपासून फ्रँचायझीचा महत्त्वाचा भाग आहे. आयपीएल साठी संघाचा सर्वात महागडा खेळाडू म्हणून त्याला संघात घेतले आहे. फ्रँचायझीने त्याला तब्बल 16 कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले होते.आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी जडेजाला चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार बनवण्यात आले होते. हंगामात संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर जडेजाने कर्णधारपद सोडले आणि हंगामाच्या मध्यात धोनीने सीएसकेची सूत्रे हाती घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com