Asia Cup नंतर 'या' दोन संघांचा सामना करण्यासाठी Team India सज्ज, पहा शेड्यूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

Asia Cup नंतर 'या' दोन संघांचा सामना करण्यासाठी Team India सज्ज, पहा शेड्यूल

Team India Full Schedule T20 World Cup : आशिया चषक 2022 मधील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाकडे टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी फक्त काही सामने बाकी आहेत. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना लवकरच सर्वोत्तम संघ निवडायला लागणार आहे. भारतीय संघ अनेक स्टार खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे.

टीम इंडिया 2022 च्या T20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवणार आहे. भारतीय संघाने अद्याप ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका मालिका किंवा टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर केलेला नाही. मात्र ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत ज्या खेळाडूंना संघात स्थान मिळेल तेच खेळाडू T20 विश्वचषक खेळतील. असे मानले जात आहे. जाणून घेऊया भारतीय संघाच्या आगामी शेड्यूल -

हेही वाचा: विराट कोहली T20 World Cup मध्ये ओपनिंग करणार? वीरेंद्र सेहवागचे धक्कादायक विधान

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे शेड्यूल

 • 20 सप्टेंबर - पहिला T20, मोहाली

 • 23 सप्टेंबर - दुसरा T20, नागपूर

 • 25 सप्टेंबर - तिसरा T20, हैदराबाद

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे शेड्यूल

 • 28 सप्टेंबर- पहिला T20I, तिरुवनंतपुरम

 • 2 ऑक्टोबर - दुसरा T20, गुवाहाटी

 • 4 ऑक्टोबर - तिसरा T20, इंदूर

हेही वाचा: Rahul Dravid : "हनिमून पिरियड संपला" राहुल द्रविडवर टीम इंडियाच्या माजी विकेटकिपरची टीका

एकदिवसीय सामने

 • 6 ऑक्टोबर - पहिला एकदिवसीय, लखनौ

 • 9 ऑक्टोबर - दुसरी एकदिवसीय, रांची

 • 11 ऑक्टोबर - तिसरा एकदिवसीय, दिल्ली

T20 विश्वचषक सराव सामना

 • 17 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

 • 19 ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड

Web Title: Team India Full Schedule T20 World Cup 2022 Australia South Africa Series Squad Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..